राणूबाई बारणे प्रशालेत क्रांतिकारकांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणूबाई बारणे प्रशालेत 
क्रांतिकारकांना अभिवादन
राणूबाई बारणे प्रशालेत क्रांतिकारकांना अभिवादन

राणूबाई बारणे प्रशालेत क्रांतिकारकांना अभिवादन

sakal_logo
By

वाकड, ता. ९ : थेरगाव येथील प्रगती शिक्षण संस्था संचालित राणूबाई नागुभाऊ बारणे प्रशाला व माध्यमिक विद्यालयामध्ये ‘क्रांतिदिन’ साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांनी देशाप्रति दिलेल्या बलिदानाची माहिती देण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक व महापालिकेतील विरोधी पक्षनेते संतोष बारणे व मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बारणे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांनी पत्करलेल्या हौतात्म्याची, क्रांतिदिनाची माहिती देत मार्गदर्शन केले. या वेळी सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, मॉं साहेब जिजाऊ आदी महापुरुषांच्या वेशभूषेतील उपस्थित विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रिया पवार, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैष्णवी देशपांडे तसेच सचिन मुळे, किशोर शिंदे, अमोल ससाणे, दत्तात्रय करगळ, महेश वाळके, युवराज गांगर्डे, प्रदीप साळवे, श्रद्धा कारले, आरती घबाडे, अमृता परीट, वंदना थाळनेर, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00820 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..