नेरेत झेंडा वाटप करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नेरेत झेंडा वाटप करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरेत झेंडा वाटप करून
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
नेरेत झेंडा वाटप करून
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
नेरेत झेंडा वाटप करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नेरेत झेंडा वाटप करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

नेरेत झेंडा वाटप करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नेरेत झेंडा वाटप करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

sakal_logo
By

हिंजवडी, ता. १० : देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाप्रती प्रेम व अभिमान व्यक्त करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक नागरिकास घरावर झेंडा फडकावून ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत सहभागी होण्यास मदत व्हावी म्हणून नेरेत (ता. मुळशी) क्रांती दिनाचे औचित्य साधून मागेल त्याला झेंडा संकल्पनेतून मोफत झेंडा वाटप अभियान राबविण्यात आले.
राष्ट्रवादीचे युवा नेते व नेरेचे माजी उपसरपंच योगेश शिंदे मित्र परिवाराच्या वतीने हा आगळा वेगळा व आदर्श स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी झेंडा वंदन कसे करावे, दक्षता कशी घ्यावी याबाबत योगेश शिंदे व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. माझा देश माझा अभिमान या मोहिमेत सर्वांनी सहभागी होत यावर्षीचा ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करावा, तसेच कार्यालयात सर्वांसाठी मोफत झेंडा देण्याची व्यवस्था केली असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंदेंनी केले आहे.
माजी सरपंच संपत जाधव, शिवाजी जाधव, गणपत जगताप, माजी चेअरमन साहेबराव जाधव, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रामदास पायगुडे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन शिंदे, मुळशी तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अजित जाधव, नितीन शेडगे, अनिल जाधव, नीलेश जाधव, सचिन जाधव, गुलाब जाधव, ओंकार जाधव, कमलेश जाधव, बबन जाधव, स्वप्नील गायकवाड, हर्षद जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ -

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00821 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..