घराबाहेर पावासाचा राडा, रस्त्यावर खड्डे अन चिखलाचा सडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घराबाहेर पावासाचा राडा, 
रस्त्यावर खड्डे अन चिखलाचा सडा
घराबाहेर पावासाचा राडा, रस्त्यावर खड्डे अन चिखलाचा सडा

घराबाहेर पावासाचा राडा, रस्त्यावर खड्डे अन चिखलाचा सडा

sakal_logo
By

वाकड, ता. ९ : वाकड फाटा ते वाकड पोलिस ठाणे ह्या अवघ्या सहाशे मीटर रस्त्याचे काम दोन वर्षे संपत आले तरीही अतिशय संथ गतीने आणि ठेकेदाराच्या सोयीनुसार सुरू आहे. हा रस्ता जागोजागी खोदण्यात आला आहे. त्यातच दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ह्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सर्वत्र खड्डे, चिखल अन राडारोडा पसरल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठ्या मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावरील शिवकॉलनी चौकात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी हा रस्ता मंगळवारी खोदण्यात आला. त्यातच शिवकॉलनी कमानी समोरील पोलिस ठाण्यापर्यंतची एक लेन तीन महिन्यापासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या लेनवर प्रचंड खड्डे, पाणी, खडी, चिखल पसरल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. एकच लेन सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे तर परिसरातील नागरिकांना ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे.
ह्या अर्बन स्ट्रीट मॉडेलच्या रस्त्याच्या कामास १६ महिन्यांचा कालावधी होता मात्र वेळ संपूनही आजपर्यंत अर्धे देखील काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे वाकड पोलिस ठाणे चौक व शिवकॉलनी चौकात सकाळी-सायंकाळी वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे हे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

जमिनी खालील सेवा वाहिन्यांमुळे कामाला वेळ लागत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात येतील.
- संध्या वाघ, उपअभियंता, स्थापत्य विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00822 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..