‘आझादी गौरव रॅली’ला मोठा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आझादी गौरव रॅली’ला मोठा प्रतिसाद
‘आझादी गौरव रॅली’ला मोठा प्रतिसाद

‘आझादी गौरव रॅली’ला मोठा प्रतिसाद

sakal_logo
By

हिंजवडी, ता. १३ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुळशी तालुका काँग्रेसने आयटी पार्क हिंजवडीत काढलेली आझादी गौरव रॅली उस्फूर्त प्रतिसादात झाली. तरुणांच्या हातातील तिरंगा ध्वज, तिरंगी छत्र्या तसेच शेकडो दुचाकीवरील तिरंग्याने वातावरण देशभक्तीमय झाले होते. देशभक्तिपर गीते, हलगी व ढोल ताशांच्या निनादाने आयटीनगरीत एक वेगळीच प्रसन्नता आली होती.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हिंजवडीच्या लक्ष्मी चौकातून पदयात्रा निघाली, छत्रपती शिवाजी चौकातील छोटेखानी सभेनंतर शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून गावठाणातील विठ्ठल रखुमाई मंदिरात रॅलीचा समारोप झाला. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, निरीक्षक दादू खान, जिल्हा उपाध्यक्ष महेश ढमढेरे, संग्राम मोहोळ, शिवाजी जांभूळकर, मुळशी तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, कार्याध्यक्ष सुरेश पारखी, दिलीप हुलावळे, संतोष साखरे, शिवाजीराव बुचडे, दादाराम मांडेकर, राहुल जाधव, सुहास भोते, युवक अध्यक्ष दिग्विजय हुलावळे, महिलाध्यक्षा रेखा शिंदे, हिंजवडीचे सरपंच मच्छिंद्र हुलावळे, शिवनाथ जांभूळकर, आकाश बुचडे, प्रवीण जांभूळकर, संदीप साखरे आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष मातेरे म्हणाले, ‘‘२८ डिसेंबर १८८५ ला स्थापना झालेल्या कॉंग्रेसला देशाप्रती बलिदान, त्यागाची परंपरा व वारसा आहे. काँग्रेसने देशाचा चौफेर विकास साधत आर्थिक सक्षमता बहाल केली. मात्र, देशवासीयांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. ही हुकूमशाही राजवट उध्वस्त करण्याची हिम्मत केवळ काँग्रेसच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यातच आहे.’’ शरद जांभूळकर यांनी सूत्रसंचालन केले. देशभक्तिपर घोषणा देत आमदार संग्राम थोपटे यांनी आभार मानले.


राजीव गांधी देशातील आयटीचे जनक ः भन्साळी
देशाचा सर्वांगिण विकास साधणाऱ्या काँग्रेसने पुणे, हिंजवडीसह देशभरात विविध ठिकाणी जागतिक दर्जाचे आयटी हब आणले. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून हे आयटी हब उभे राहिले आहेत. त्यांच्या स्वप्न पूर्तीतूनच भारतात संगणक क्रांती झाली. ७५ वर्षात काँग्रेसने देशातील सर्व सामान्य जनतेला सुख-समृद्धी बहाल केली होती. मात्र, मोदींनी काँग्रेसने ७५ वर्षात काय केले असा कांगावा करीत देशात महागाईचा कळस गाठला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना भेडसाविण्याशिवाय सर्व सामान्यांसाठी काय काम केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00836 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..