‘गोविंदा आला रे..आला’चा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोविंदा आला रे..आला’चा जल्लोष
‘गोविंदा आला रे..आला’चा जल्लोष

‘गोविंदा आला रे..आला’चा जल्लोष

sakal_logo
By

वाकड, ता. १९ : गणेश नगर, थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलात शिक्षिकांनी दहीहंडीचे पूजन केले. श्रीकृष्ण व राधेचा वेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. विद्यार्थी व शिक्षकांनी नृत्याचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी आणलेल्या चुरमुरे, पोहे, लाह्या, कोथिंबीर, मिरची, दही इत्यादी साहित्य आणले होते. ते एकत्र करून काल्याचा प्रसाद देण्यात आला.
तिसरीच्या रोशनी राठोडने कृष्ण जन्मला, ही गोष्ट सांगितली. दुसरीच्या मनस्वी दरंदले हिने सुरेल आवाजात अच्युतम केशवम, हा अभंग गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. पहिलीतील अथर्व सावरे याने ‘यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला’ ही गवळण गायली. सहशिक्षिका योगिता गायकवाड यांनी कृष्णजन्माची गोष्ट सांगून, काला कशाला म्हणतात हे समजून सांगितले. साक्षी कुरळे व मंजूषा गोडसे यांनी ‘असलं रे कसलं वागणं तुझं, जगाच्या वेगळं’ हे गीत गायले.
मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी ‘यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी’ ही गवळण आपल्या खास शैलीत गायले श्रीकृष्णाने दुष्ट अशा कंस, शिशुपाल, पुतना मावशी यांचा वध कसा केला हे गोष्टी रूपाने सांगून श्रीकृष्णाने दुष्टांचे राज्य कसे नष्ट केले हे समजावून सांगितले. काला हा समरसतेचे प्रतीक म्हणजेच पांढऱ्या रंगाचा का असतो, याचीही माहिती दिली. प्रमोदिनी बकरे यांनी आभार मानले. नीता साळवे, शुभांगी धिवार यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00852 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..