आयटी पार्क लगतच्या गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटी पार्क लगतच्या गावांच्या 
स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी
आयटी पार्क लगतच्या गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी

आयटी पार्क लगतच्या गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी

sakal_logo
By

हिंजवडी, ता. २५ : अल्पावधीतच वाढलेल्या आयटी पार्क लगतच्या हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याऐवजी या गावांसाठी ‘क’ दर्जाच्या स्वतंत्र नगरपरिषदेची स्थापना करावी, अशी मागणी मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (ता. २३) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात करून सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या मागणीचा व्हिडिओ देखील आयटी पंचक्रोशीत प्रचंड व्हायरल झाला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे राज्यातील शिंदे-भाजप सरकारने तरी याबाबत काय तो ठोस निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत असून झपाट्याने वाढत असलेल्या आयटीतील गावांचा सुनियोजित विकास व सक्षम पायाभूत सुविधांसाठी सरकारने अधिक वेळ न घालवता ही गावे महापालिकेत समाविष्ट करावीत अन्यथा स्वतंत्र नगरपालिका अथवा नगरपरिषदेची स्थापना करावी, अशी कुजबूज देखील ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
गावांचा विकास आराखडा, विविध आरक्षणे व नियोजनाचा अभाव असल्याने वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरविताना ग्रामपंचायतींची मोठी दमछाक होत आहे. बेकायदेशीर बांधकामांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने प्रचंड बकालपणा वाढत आहे. त्यामुळे या सरकारने समाजहित लक्षात घेऊन तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. ही गावे महापालिकेत घेण्यास विरोध करून या गावांची मिळून एक स्वतंत्र नगरपरिषद किंवा ‘क’ दर्जाची नगरपालिका करा. अशी काही पुढारी व लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे

चौकट --
काही ग्रामपंचायतीचा विरोध; काहींचा हिरवा कंदील
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व भाजपचे पिंपरी-चिंचवड मधील काही नेते ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत घ्यावीत म्हणून मागील पाच सहा वर्षांपासून आग्रही आहेत. तर संग्राम थोपटे यांनी येथील या भागासाठी स्वतंत्र नगरपरिषदेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला आहे. परंतु महापालिका समावेशास येथील काही ग्रामपंचायतीचा विरोध असून त्यांनी तसा ठराव देखील यापूर्वी दिला आहे. तर काही ग्रामपंचायतींनी विकास कामांना खीळ नको म्हणून महापालिका समावेशाला हिरवा कंदील दाखवला होता.
-----------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00866 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..