हिंजवडीच्या उपसरपंचपदी पल्लवी गंगावणे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंजवडीच्या उपसरपंचपदी 
पल्लवी गंगावणे बिनविरोध
हिंजवडीच्या उपसरपंचपदी पल्लवी गंगावणे बिनविरोध

हिंजवडीच्या उपसरपंचपदी पल्लवी गंगावणे बिनविरोध

sakal_logo
By

हिंजवडी, ता. २५ : आयटीनगरी हिंजवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पल्लवी गंगावणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवानी जांभूळकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सोमवारी (ता. २२) निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
सरपंच मच्छिंद्र हुलावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी गंगावणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर यांनी केली. निवडीनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंचांचा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती हुलावळे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संतोष साखरे, माजी सरपंच मल्हारी साखरे, श्यामराव हुलावळे, तानाजी हुलावळे, शिवाजी जांभूळकर, दिलीप हुलावळे, प्रवीण जांभूळकर, गणेश जांभूळकर, विशाल साखरे, विक्रम साखरे, मनिषा हु‌लावळे, रेखा साखरे तसेच कोअर कमिटी व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ः 02349

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00867 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..