सोल्जर ॲकॅडमीतील चार विद्यार्थ्यांची एनसीसीत निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोल्जर ॲकॅडमीतील 
चार विद्यार्थ्यांची एनसीसीत निवड
सोल्जर ॲकॅडमीतील चार विद्यार्थ्यांची एनसीसीत निवड

सोल्जर ॲकॅडमीतील चार विद्यार्थ्यांची एनसीसीत निवड

sakal_logo
By

हिंजवडी, ता. ३१ : राम सोनई फार्म नेरे येथील पोलिस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सोल्जर ॲकॅडमी मधील चार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची दोन महाराष्ट्र एनसीसी (नॅशनल कॅडेट कोअर) बटालियनमध्ये निवड झाली आहे. या चौघांपैकी एकाच घरातील तीन भावांचा समावेश आहे. खेड तालुक्यातील शिवे गावात राहणारे अजय आणि आकाश शिवेकर हे जुळे भाऊ असून अनुराग शिवेकर हा त्यांचा चुलत भाऊ आहे.

शारीरिक चाचणीसह लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या उत्तम गुणांच्या आधारे आकाश शिवेकर, अजय शिवेकर अनुराग शिवेकर, रितेश आडकर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे विद्यार्थी पुणे व पिंपरी-चिंचवड मधील विविध महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच त्यांनी ही उत्तुंग कामगिरी केली आहे. राष्ट्रीय छात्र सेना भरतीसाठी एनसीसी ग्रुपच्या पुणे येथील ग्रुप हेडक्वार्टरमध्ये सैन्य अधिकाऱ्यांमार्फत चाचणी घेण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना ॲकॅडमीचे संचालक व कारगिल योद्धा रामदास मदने, कृषी आयडॉल कैलास जाधव, मुख्य प्रशिक्षक मोहनिश बारिया यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो नंबर
143658 - अजय शिवेकर
WA0095 - आकाश शिवेकर
WA0084 - अनुराग शिवेकर
WA0093 - रितेश आडकर

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00878 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..