हिंजवडीतील बार मालक खुनाच्या गुन्ह्यात गजाआड खुनाचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंजवडीतील बार मालक 
खुनाच्या गुन्ह्यात गजाआड
खुनाचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप
हिंजवडीतील बार मालक खुनाच्या गुन्ह्यात गजाआड खुनाचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप

हिंजवडीतील बार मालक खुनाच्या गुन्ह्यात गजाआड खुनाचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप

sakal_logo
By

हिंजवडी, ता. ४ ः कंट्री बारमध्ये दारूचा ग्लास सांडल्याच्या कारणावरून झालेल्या खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची संगनमताने व परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह कचऱ्याच्या ढिगात फेकणाऱ्या हिंजवडीतील प्रसिद्ध बार मालकासह अन्य दोघांना हिंजवडी पोलिसांनी गजाआड केले. या प्रकरणातील अन्य तिघे फरार असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
बाबू ऊर्फ बाबासाहेब चंद्रकांत साखरे (वय ३५, रा. हिंजवडी) असे त्या बार मालकाचे नाव आहे. त्याच्यासह नीलेश सतीश धुमाळ (रा. उस्मानाबाद) व गाडीचालक स्वप्नील थोरात (रा. कराड, सातारा) यांना खुनाच्या आरोपाखाली हिंजवडी पोलिसांनी अटक केली तर किशोर शिंदे, अखिलेश शिंदे व धर्मेंद्र यादव हे बारमधील कर्मचारी अद्यापही फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
हिंजवडी येथील जयरामनगर भागात असलेल्या अशोका बारमध्ये एका अनोळखी व्यक्तीला मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना महिनाभरापूर्वी हिंजवडीत उघडकीस आली होती. खून झालेल्या व्यक्तीचे बालाजी नाव असून, तो फिरस्ता असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. माण-म्हाळुंगे रस्त्यालगत कचऱ्याच्या ढिगात १७ जुलैला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हिंजवडी पोलिसांना सडलेल्या अवस्थेत मिळून आला होता.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की हॉटेल अशोका कंट्री बारमध्ये दारू पिताना बालाजीकडून दारूचा ग्लास सांडला. या रागातून नीलेशने त्याला दारूची बाटली आणि काठीच्या साह्याने जबर मारहाण केली होती. त्यात बालाजीचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर हॉटेलचा मॅनेजर किशोर शिंदे, अखिलेश शिंदे व धर्मेंद्र यादव यांनी बालाजीचा मृतदेह एका चारचाकी गाडीत भरून तो म्हाळुंगे रस्त्यावर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00883 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..