पर्यावरणपूरक हौदातून दोन हजार मूर्तींचे संकलन मूर्तीदान मोहीम : जलप्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक हौदातून दोन हजार मूर्तींचे संकलन 
मूर्तीदान मोहीम : जलप्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम
पर्यावरणपूरक हौदातून दोन हजार मूर्तींचे संकलन मूर्तीदान मोहीम : जलप्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम

पर्यावरणपूरक हौदातून दोन हजार मूर्तींचे संकलन मूर्तीदान मोहीम : जलप्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम

sakal_logo
By

वाकड, ता. ८ : गणेश विसर्जनातून वाढलेल्या जलप्रदूषणाला व गणरायाच्या विटंबनेला ब्रेक लागण्यास मदत व्हावी म्हणून वाकड, कस्तुरी चौकातील द्रौपदा लॉन्स येथे पर्यावरणपूरक हौदात नागरिकांनी श्रींचे विसर्जन केल्याने गेल्या सहा दिवसांत येथे तब्बल दोन हजारांहून अधिक मूर्तींचे संकलन झाले आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला मात्र मोठा हातभार लागत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखला जावा, गणेश भक्तांनी नदी नाल्यात, ओढ्यात, विहिरीत मूर्ती विसर्जन करून पर्यावरणास हानी पोचवू नये, या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने या हौदाची निर्मिती करण्यात आली आहे. गणेश मंडळांसाठी पाच फुटापर्यंतच्या सर्व प्रकारच्या तसेच घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन व मूर्तीदान करण्यासाठी काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी या विसर्जन घाटाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कुंडाच्या सुविधेसह हौद परिसरात मदतीसाठी शिवराज कुंभार यांच्या देखरेखीत सहा स्वयंसेवक देखील तैनात आहेत. संकलित करण्यात आलेल्या मूर्ती श्री फाउंडेशनकडे सुपूर्त केल्या जातात. फाउंडेशन या मूर्तींचे किरकोळ रंगकाम करून पुढच्या वर्षी त्यांची अर्ध्या किमतीत विक्री केली जाते. या पैशातून अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना मदत केली जाते.


चौकट -
भावनेच्या भरात आपण सर्वजण पर्यावरणाचा ऱ्हास करतोय. हे थांबावे म्हणून विसर्जन हौदाची निर्मिती करण्यात आली असून नागरिकांनी गणेश विसर्जन करण्यासाठी हौदाचा उपयोग करून. पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा.
- विशाल वाकडकर, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक
फोटोः
02433

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00897 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..