रस्त्यांवर कचरा टाकल्यास उठाबशा स्वच्छ ‘आयटी’ ः ग्रामस्थांकडून उपाययोजना, पाच हजारांचा दंडही ठोठावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांवर कचरा टाकल्यास उठाबशा
स्वच्छ ‘आयटी’ ः ग्रामस्थांकडून उपाययोजना, पाच हजारांचा दंडही ठोठावणार
रस्त्यांवर कचरा टाकल्यास उठाबशा स्वच्छ ‘आयटी’ ः ग्रामस्थांकडून उपाययोजना, पाच हजारांचा दंडही ठोठावणार

रस्त्यांवर कचरा टाकल्यास उठाबशा स्वच्छ ‘आयटी’ ः ग्रामस्थांकडून उपाययोजना, पाच हजारांचा दंडही ठोठावणार

sakal_logo
By

हिंजवडी, ता. ८ : ‘आयटी’च्या झगमगाटात हिंजवडी पंचक्रोशीतील गावांचा चेहरा मोहरा बदलेला असताना, आयटीतील रस्त्यांवर मात्र कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे ओंगळवाणे प्रदर्शन कायम घडते. यावर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत अनोखी
शक्कल लढवली आहे. त्यामुळे आता कचरा बहाद्दरांना उठाबशांच्या प्रसादासह पाच हजारांचा दंड आणि पोलिसांच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागू शकते.
याबाबत माहिती अशी, नेरे-मारुंजी ग्रामपंचायतीने घरगुती कचरा संकलनासाठी विविध संस्थांना लाखो रुपयांचे टेंडर दिले आहे. त्यानुसार आठ ते दहा घंटागाडी घरोघर फिरतात. तरीही काहीजण ट्रॅक्टरमध्ये कचरा न टाकता छुप्या पद्धतीने नेरे-मारुंजी या मुख्य रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे रस्त्यात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचून दुर्गंधी व अस्वच्छता पसरते. ही घाण आरोग्यासाठी हानिकारक तर आहेतच. या शिवाय ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या प्रतिमेला बाधा पोचविणारी आहे. याबाबत जनजागृती, उपाययोजना, फलकबाजी, उघड्यावर कचरा न टाकण्याचे आव्हान व दंडात्मक कार्यवाही करूनदेखील कचऱ्यांचे ढिगारे उलट वाढतच राहिले. त्यामुळे प्रभाकर शिंदे, बाबूराव बुचडे, संदीप जाधव, गजानन शिंदे, विशाल सावंत, रोहित जाधव, सुग्रीव कदम, अजित पवार यांच्यासह काही ग्रामस्थांनी स्वतःचा नेरे-मारुंजी पॅटर्न तयार केला. कचरा साचणाऱ्या ठिकाणी आजूबाजूला या पथकातील दोघे दिवसा आणि दोघे रात्री लपून दबा धरून बसतात. पाळत ठेवून कचरा टाकणाऱ्याला रंगेहाथ पकडून त्याला उठा-बशा काढायला लावले जाते आणि ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन, पाच हजारांच्या दंडाची पावती फाडली जाते. कोणी अतिहुशार असेल तर पोलिसात तक्रार देखील दाखल केली जाते.

चौकट -
कचरामुक्त गाव मोहीम
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना उठाबशा काढायला लावल्याचा व्हिडिओ गेल्या तीन-चार दिवसात आयटी परिसरात व्हायरल झाल्याने येथील कचरा कमालीचा कमी झाला आहे. मारुंजीचे सरपंच आकाश बुचडे यांनीदेखील तिघांना पकडून दंडात्मक कारवाई केली. या सर्वांच्या मदतीला आता हिंजवडी पोलिस देखील धावून आल्याने स्वच्छता दूतांना आणखी बळ मिळाले आहे. लवकरच कचरा मुक्त गाव मोहिमेसाठी ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी मिळून मानवी साखळी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


प्रतिक्रीया
उघड्यावर बेकायदेशीरपणे कचरा टाकल्याने सार्वजनिक स्वच्छतेला बाधा पोचविण्याबरोबर दुर्गंधी व रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे असा उघड्यावर कचरा टाकणाऱ्यास ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे आणल्यास आम्ही हयगय न करता कायदेशीर कडक कारवाई करणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेत सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.
- डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे


फोटोः 02439

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00899 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..