आयटी नगरीने दिला भावपूर्ण निरोप विसर्जन मिरवणुकीत डीजे अन् ढोल ताशांचा गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटी नगरीने दिला भावपूर्ण निरोप 
विसर्जन मिरवणुकीत डीजे अन् ढोल ताशांचा गजर
आयटी नगरीने दिला भावपूर्ण निरोप विसर्जन मिरवणुकीत डीजे अन् ढोल ताशांचा गजर

आयटी नगरीने दिला भावपूर्ण निरोप विसर्जन मिरवणुकीत डीजे अन् ढोल ताशांचा गजर

sakal_logo
By

हिंजवडी, ता. १० : आयटी नगरी हिंजवडी परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी आयटी नगरीने ढोल-ताशांचा गजर अन डीजेचा दणदणाटाचा जल्लोष अनुभवला. यंदा मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीवर भरीव खर्च करीत उत्कृष्ट देखावे व आकर्षक मिरवणूक रथ साकारले होते.
विसर्जन मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतलेल्या मंडळांचा व नागरिकांचा सुरवातीलाच पावसाने काही काळ हिरमोड केला. सातच्या सुमारास जय भवानी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने सुरवात झाली. छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या गणपतीने सर्वांचे लक्ष वेधले. मंडळाने शिवाजी महाराजांना विशेष मानवंदना दिली. त्यानंतर हनुमान तालीम मित्र मंडळ, पंचरत्न तरुण मंडळाने आकर्षक सजावटीने उपस्थितांची वाहवा मिळविली. क्रांती मित्र मंडळ, संत तुकाराम मित्र मंडळ, मुकाई मित्र मंडळानेदेखील उपस्थितांना खिळवून ठेवले.
दोन वर्षांनी गणेश विसर्जन मिरवणूक होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. रस्ते नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. नेत्रदीपक एलईडी लाईट, गुलालाची उधळण त्याबरोबर ढोल-ताशा आणि डीजेच्या तालावर आयटीयन्स तरुण-तरुणी तासनतास थिरकत होती. अखेरच्या दिवसात राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांना धावत्या भेटी दिल्याने वेगवेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या तर काही मंडळांना सेलिब्रेटींनी देखील भेट देऊन गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित केला.

चौकट -
हलगीचा ठेका अन आयटीयन्सचा ताल

हिंजवडीतील हाय प्रोफाइल व उच्चभ्रू असलेल्या ब्ल्यूरिज टाऊनशिपमधील डी युनिटने मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला. अनंत चतुर्थीला आकर्षक रथात, ढोल-ताशा, झांज पथक व हलगी, संबळ, सनई सुरांच्या गजरात भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दिलीप भरणे हे या मंडळाचे अध्यक्ष असून, त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या हायटेक सिटीतील मिरवणुकीत ग्रामीण व पारंपरिक बाज पाहायला मिळाला. पारंपरिक हलगीच्या ठेक्यावर शेकडो अभियंता तरुण-तरुणींनी ठेका धरला होता. हातात भगवा झेंडा घेऊन व सर्वांनी भगवे फेटे परिधान करून फेर धरल्याने वातावरण भगवेमय झाले होते. यावेळी माणचे माजी सरपंच सुनील भरणे यांच्यासह हजारो आयटीयन्स सहकुटुंब सहभागी झाले होते.

----------
फोटोओळ

02456, 02457

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00904 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..