ग्रामस्थ व अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी काम बंद पाडले ः रस्त्यालगतचा भूभाग खोदल्याने आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामस्थ व अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी
काम बंद पाडले ः रस्त्यालगतचा भूभाग खोदल्याने आक्रमक
ग्रामस्थ व अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी काम बंद पाडले ः रस्त्यालगतचा भूभाग खोदल्याने आक्रमक

ग्रामस्थ व अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी काम बंद पाडले ः रस्त्यालगतचा भूभाग खोदल्याने आक्रमक

sakal_logo
By

हिंजवडी, ता. १७ : सीमाभिंत बांधण्यासाठी आयटीनगरी माण ग्रामपंचायत हद्दीतील माण गावठाण ते गंगाराम वाडी फेज तीनला जाणाऱ्या रस्त्यालगतचा तंतोतंत भूभाग पीएमआरडीएने विनापरवाना खोदल्याचा आरोप करीत माण ग्रामस्थांनी विरोध करून काम बंद पाडले. यावरून पीएमआरडीए अधिकारी, ठेकेदार व
ग्रामस्थ यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. अखेर ग्रामस्थांनी पीएमआरडीएचे नवनियुक्त आयुक्त राहुल मेहवाल यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले तसेच
माणगाव बचाव कृती समिती व ग्रामपंचायतीने निवेदनही दिले. मेहवाल यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत हे काम तूर्तास थांबविण्याचे तोंडी आदेश दिले आहेत तर पंचायत समिती मुळशी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडेही ग्रामस्थांनी लेखी तक्रार करून हा प्रकार कळवला आहे.
माण चौक ते भोईरवाडी रस्ता या रस्त्यालगत पुणे मेट्रोने रस्त्याच्या बाजूला कुठलीही जागा न सोडता सीमाभिंतीचे काम चालू केले आहे. ग्राममार्ग क्रमांक ६१ हा १२ मीटरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून, ग्रामपंचायतीने त्यावर पक्के सिमेंटीकरण केले आले. अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता ग्रामस्थांना व ग्रामपंचायत कार्यालयाला कुठलीही पूर्व कल्पना न देता खोदला आहे. सुमारे दीडशे फूट लांब व सात ते आठ फूट खोल रस्ता खोदण्यात आला आहे
पीएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्यातील ३० मीटर रस्त्याची जागा सोडून सीमाभिंतीचे काम करावे, हा रस्ता आयटी पार्क, रायसोनी पार्क, भोईरवाडी, गंगारामवाडी साठेवाडी तसेच मोठ-मोठया गृहप्रकल्पांना जोडला गेल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणांवर रहदारी असते. ग्रामपंचायतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या ४.५ मीटर जागा मोकळी सोडली आहे. असे असताना पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने या रस्ताच्या दोन्ही बाजूच्या ४.५ मीटर मोकळ्या जागा सोडून न देता ग्रामपंचायतीने केलेल्या रस्त्याला लागून संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु केल्याने मोठी वाहतूक समस्या निर्माण झाली आहे, असे पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया
हा रस्ता गावातील वाडी-वस्त्यांच्या वापरासाठी असून भोईरवाडी, साठेवाडी, गंगाराम वाडीच्या वहिवाटीचा गेली शंभर वर्षे जुना आहे. पीएमआरडीएने रस्त्यालगत बांधकाम केल्याने भविष्यात ड्रेनेज लाईन व पदपथ उभारण्यात अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे गावच्या रस्त्यावर आम्ही अतिक्रमण होऊ देणार नाही.
- सुरेश पारखी
ग्रामस्थ, सदस्य माण गाव बचाव कृती समिती


पीएमआरडीएने ही जागा आरक्षित केली आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या जागेतच मेट्रो प्रकल्पासाठी कार डेपो होत आहे. हे काम टाटा करीत असून, त्यासाठी सीमाभिंत बांधण्याचे काम सुरू आहे. हा भविष्यातील प्रस्तावित ३० मीटरचा रस्ता आहे. ग्रामपंचायात हद्दीत अतिक्रमण न करता कायदेशीर कामकाज सुरू आहे. तसे लेखी उत्तर आम्ही माण ग्रामपंचायतीला देत आहोत.
- भरतकुमार बाविस्कर
अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए


फोटो ः 02513

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00921 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..