महामार्गावरील खड्डा ठेकेदाराला पडला महागात हिंजवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावरील खड्डा 
ठेकेदाराला पडला महागात 

हिंजवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल
महामार्गावरील खड्डा ठेकेदाराला पडला महागात हिंजवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

महामार्गावरील खड्डा ठेकेदाराला पडला महागात हिंजवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

sakal_logo
By

हिंजवडी, ता. २१ : आयटी पार्क परिसरातून जाणारा मुंबई-बंगळूर महामार्ग व येथील रस्ते, नेहमी वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेले असतात. सोमवारी (ता. १९) खड्डे चुकविताना डंपर पलटी झाल्याच्या प्रकरणात महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला दोषी धरत हिंजवडी पोलिसांनी बुधवारी (ता. २१) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस कर्मचारी आबा कुंडलिक सूळ यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात डंपरचालक मधुकर कांबळे (वय. ३२) हे किरकोळ जखमी झाले. मात्र, महामार्गावर डंपर पलटल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता. वाहनांच्या रांगा लागल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अन्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांवर हातात घमेले घेऊन खड्डे बुजविण्याची वेळ आली होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून महामार्ग
प्रशासनाने देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती. याची दखल घेत ठेकेदाराला दोषी धरून पोलिसांकडून तक्रार देण्यात आल्यानंतर संबंधित रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे येथून पुढे रस्त्यातील खड्डे ठेकेदारांना भोवणार आणि महागात पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील एका बड्या उद्योग समूहाने हे काम घेऊन, त्यांनी महाराष्ट्रातील अन्य एका कंपनीला उपकंत्राट दिल्याचे समजते.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00932 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..