मुलीच्या अपहरणाबाबत तर्क-वितर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीच्या अपहरणाबाबत तर्क-वितर्क
मुलीच्या अपहरणाबाबत तर्क-वितर्क

मुलीच्या अपहरणाबाबत तर्क-वितर्क

sakal_logo
By

वाकड, ता. २३ : कस्पटेवस्ती येथील माउंट व्हर्ट सिव्हेले या सोसायटीत पार्किंगमध्ये खेळणाऱ्या शाळकरी मुलीचे गुरुवारी (ता. २२) दुपारी साडे तीनच्या सुमारास अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या व्यक्तीच्या हाताचा चावा घेऊन झटका दिल्याने ती मुलगी स्वतःला वाचविण्यात यशस्वी झाली. ही घटना खरीच घडल्याचा दावा करण्यासाठी सोसायटीकडे कुठलाही ठोस पुरावा नाही तर वाकड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चौकशीअंती ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबत माहिती अशी, सातवीत शिकणारी बारा वर्षीय विद्यार्थिनी गुरुवारी (ता. २२) दुपारी तीन वाजता शाळेतून सोसायटीत आली. ती शाळेतील सोबतच्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्किंगमध्ये काही वेळ खेळून फ्लॅटमध्ये जात असताना मागून आलेल्या व बुरखासदृष्य काळे कपडे परिधान केलेल्या आणि तोंडाला मास्क लावलेल्या व्यक्तीने तिचा हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. अगदी काही सेकंद झटापट करून तिने चावा घेऊन पळ काढला. घाबरलेल्या त्या मुलीने घडला प्रकार आईला सांगितला. पाहता-पाहता खबर सर्व सोसायटीत पसरली झाली. असे सोसायटी राहिवाशी आणि अध्यक्षांचे यांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात सोसायटी आवारात जिथे ही घटना घडली. त्या ठिकाणचा सीसी टीव्ही कॅमेरा बंद आहे. सोसायटीला दोन गेट असून एकाही गेटवरील सुरक्षारक्षकांच्या रजिस्टरमध्ये अनोळखी व्यक्तीच्या येण्याजाण्याची नोंद नाही. अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे वर्णन किंवा तो पुरुष की स्त्री होती हे ही त्या मुलीला स्पष्ट सांगता येत नाही. मात्र, अशा घटनांना प्रतिबंध व सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सोसायटीने सायंकाळी बैठक आयोजित केली आहे.


मुलगी धड-धाकट, अंगांने जाड व उंच आहे. त्यामुळे ती संबंधित व्यक्तीच्या हाताला हिसका देऊन पळ काढू शकली, अशी माहिती आहे. संबंधित व्यक्ती रेकी करूनच आला असावा असाही अंदाज आहे. मात्र, हा नेमका प्रकार काय आहे, यात काय तथ्य आहे, हे पोलिस तपासात स्पष्ट होईल. सोसायटीत नेहमी येणाऱ्या विविध एजन्सीचे कर्मचारी, कामगारांची चौकशी करण्याबाबत आम्ही पोलिसांना पत्र दिले आहे.
- गणेश ढोरे, अध्यक्ष, माउंट व्हर्ट सिव्हेले सोसायटी

आम्ही आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले. मात्र, संशयित काही आढळले नाही. त्या मुलीसोबत खेळणाऱ्या इतर मुलांनाही विचारले असता ते म्हणतात की, आम्ही कोणाला पाहिले नाही. त्यामुळे हा त्या मुलीला झालेला गैरसमज किंवा भास असावा तरीही आम्ही सर्व त्या शक्यता गृहीत धरून पडताळणी करीत आहोत.
- सत्यवान माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00935 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..