धोकादायक चेंबर्सची तत्काळ दुरुस्ती करा ः कलाटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक चेंबर्सची 
तत्काळ दुरुस्ती करा ः कलाटे
धोकादायक चेंबर्सची तत्काळ दुरुस्ती करा ः कलाटे

धोकादायक चेंबर्सची तत्काळ दुरुस्ती करा ः कलाटे

sakal_logo
By

वाकड, ता. २३ : येथील गोल्ड फिंगर सोसायटी ते भुयारी मार्ग या रस्त्याची अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, या रस्त्यातील अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या धोकादायक अशा चेंबरची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे रणजित आबा कलाटे फाउंडेशनने निवेदनाद्वारे केली आहे.
कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे यांनी हे निवेदन दिले आहे. येथील हॉटेल टीपटॉप समोर भुयारी मार्गालगतच्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून जैसे थे आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून बारमाही नदी वाहत असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे. तर वाकडकडे जाताना गोल्ड फिंगर सोसायटी समोरील रस्त्यावर तीन ते चार चेंबर्स अतिशय धोकादायक बनले आहेत. या खोल चेंबरवरील झाकणे गायब झाली आहेत. या रस्त्यावर २४ तास वाहने आणि माणसांची मोठी वर्दळ असते.
आयटीयन्स, कामगार, मजूर, रहिवासी कायम येथून ये-जा करतात. या रस्त्यावर कायम वाहणारे पाणी झाकणे नसल्याने या चेंबरमध्ये जाते. त्यामुळे ऐन रस्त्यात झाकण नसलेला खोल चेंबर जीवघेणा खड्डा आहे. याचा अंदाज येत नसल्याने सुमारे चार फूट खोल असलेल्या या चेंबरमध्ये वाहने अडकून अपघात होत आहेत. आजवर अनेकजण किरकोळ जखमी झालेत. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट बघण्याअगोदर या चेंबरची तत्काळ दुरुस्ती करून येथील अपघात थांबवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

चेंबरवरील झाकणे गायब झाल्याने त्यात पाणी साठते. त्यामुळे वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत. सुदैवाने आजवर मोठी हानी झाली नाही. मात्र, हे चेंबर असेच राहिले तर नक्की मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करावी.
- स्नेहा कलाटे

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00936 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..