वाकड-हिंजवडीत म्हातोबा देवाचा पालखी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकड-हिंजवडीत म्हातोबा देवाचा पालखी सोहळा
वाकड-हिंजवडीत म्हातोबा देवाचा पालखी सोहळा

वाकड-हिंजवडीत म्हातोबा देवाचा पालखी सोहळा

sakal_logo
By

वाकड, ता. १ : वाकड-हिंजवडीकरांसह पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाची आश्विन शु. पंचमीला निघणारी छबिना मिरवणूक (पालखी) सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात झाली. वाकड आणि हिंजवडी गावठाणातील म्हातोबा मंदिरात पहिल्या दिवशी सकाळी घटस्थापना करून आरती करण्यात आली.
नवरात्रोत्सवात शुक्रवारी पाचव्या दिवशी म्हणजेच आश्विन शु. पंचमीला वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात वाकड आणि हिंजवडी ग्रामस्थ रात्री नऊ वाजता एकवटले. वाद्यांच्या निनादात पालखी निघाली मंदिराला प्रदक्षणा घालून देवाची आरती करण्यात आली. हा सोहळा पाचव्या दिवसांपासून विजयादशमीपर्यंत (दसरा) दररोज वाकड येथील म्हातोबा मंदिरात रात्री पार पडतो.
नवरात्रोत्सव व दसऱ्याचे औचित्य साधून पंचमीला निघालेल्या मिरवणुकीनंतर किसन साखरे पाटील, राजाराम जांभूळकर, गोरख जांभूळकर, विठोबा जांभूळकर, मच्छिंद्र जांभूळकर, धोंडिबा जांभूळकर यांच्याकडून वाकड-हिंजवडीतील म्हातोबा देवाच्या मानकऱ्यांना वस्त्रदान करून सन्मान करण्यात आला, अशी माहिती राहुल साखरे पाटील यांनी दिली. वाकडच्या स्थानिक वाद्य पथकाने या पालखी सोहळ्यात प्रसन्नता आणली.