पुनावळेत स्वखर्चाने केला रस्ता दुरुस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनावळेत स्वखर्चाने केला रस्ता दुरुस्त
पुनावळेत स्वखर्चाने केला रस्ता दुरुस्त

पुनावळेत स्वखर्चाने केला रस्ता दुरुस्त

sakal_logo
By

हिंजवडी, ता. १ : मुंबई-बंगळुरू महामार्गालगत पुनावळे चौक ते पवना नदीच्या अलीकडे सुमारे गुडघाभर खोलीचे जीवघेणे असंख्य खड्डे. अतिशय बिकट अवस्था झालेला सुमारे पाऊण किलोमीटरचा सेवा रस्ता! दररोज लोक संताप व्यक्त करत होते. हे पाहून गावकारभाऱ्यांनी स्वखर्चातून मुरूम, क्रशसँड टाकून व रस्ते बांधणीची सर्व यंत्र सामग्री वापरून खड्डे बुजविले.

या पट्ट्यात मोठा विकास झाला असून अनेक मोठे गृहप्रकल्प आल्याने लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. पर्यायाने रस्त्यांवरील वर्दळही कमालीची वाढली. मात्र, सेवा रस्त्यातील मोठे खड्डे आणि त्यात पाणी साठल्याने जागोजागी तयार झालेली तळी रहिवाशांची मोठी डोकेदुखी ठरत होती. रात्री ये-जा करताना या असंख्य खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे वारंवार अपघातही होत. याबाबत महामार्ग प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर गावकारभाऱ्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांनी स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त केला. खड्ड्यात साचलेले पाणी जेसीबीच्या सहाय्याने काढून रस्ता कोरडा केला त्यात मुरूम टाकला. रोलर फिरवून रस्ता सपाट केला. आता महामार्ग प्रशासनाने रस्त्याचे काम करून ही समस्या कायमची सोडवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे,