वाकड शाळेत सणाच्या माध्यमातून शिक्षण उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकड शाळेत सणाच्या 
माध्यमातून शिक्षण उपक्रम
वाकड शाळेत सणाच्या माध्यमातून शिक्षण उपक्रम

वाकड शाळेत सणाच्या माध्यमातून शिक्षण उपक्रम

sakal_logo
By

वाकड, ता. ३ : वाकड महापालिका प्राथमिक (मुले) शाळेत बालवाडीमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त नवरात्र रंगोत्सव उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येक दिवशी जो रंग असेल त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी पेहराव केला. लहानग्या विद्यार्थ्यांना रंग परिचय संकल्पना चांगली कळावी म्हणून प्रत्येक रंगाच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. एकाच रंगाच्या अनेक वस्तू पाहून मुलांचा रंग परिचय दृढ होतो, म्हणून सणाच्या माध्यमातून शिक्षण हा आगळा उपक्रम आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक रामचंद्र पिसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. वर्गशिक्षिका नेत्रा चंद्रकांत शेलार यांनी आयोजन केले. पालकांचे उत्तम सहकार्य लाभले.