थेरगावात भ्रष्टाचाररुपी प्रतिकात्मक रावणाचे दहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेरगावात भ्रष्टाचाररुपी प्रतिकात्मक रावणाचे दहन
थेरगावात भ्रष्टाचाररुपी प्रतिकात्मक रावणाचे दहन

थेरगावात भ्रष्टाचाररुपी प्रतिकात्मक रावणाचे दहन

sakal_logo
By

थेरगावात भ्रष्टाचाररुपी रावणाचे दहन


वाकड, ता. ४ : थेरगाव येथील डांगे चौकातील लिटिल चॅम्प्स प्री स्कूलमध्ये विजयादशमीनिमित्त भ्रष्टाचार, बालमजुरी, स्त्री-भ्रूणहत्या, हुंडाबळी रुपी प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात आले.
यानिमित्त, सर्व बालचमूंनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. कार्यक्रमात चिमुकल्यांनी प्रभू श्री रामचंद्र की जय असा जयघोष केला. विद्यार्थी आणि शिक्षिकांनी मिळून गरबा खेळत दसऱ्याचा सण उत्साहात साजरा केला. लहान वयात मुलांवर योग्य आणि सुसंस्कार व्हावेत. आपली संस्कृती, सण व परंपरांची ओळख त्यांना व्हावी यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया भोईर या सदैव प्रयत्नशील असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रेवती धामणे यांनी सूत्रसंचालन केले.