थेरगावात ज्येष्ठ नागरिक संघाकडून वाचन प्रेरणा दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेरगावात ज्येष्ठ नागरिक संघाकडून
वाचन प्रेरणा दिन उत्साहात
थेरगावात ज्येष्ठ नागरिक संघाकडून वाचन प्रेरणा दिन उत्साहात

थेरगावात ज्येष्ठ नागरिक संघाकडून वाचन प्रेरणा दिन उत्साहात

sakal_logo
By

वाकड, ता. १६ : साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा व गणेशनगर, थेरगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शिव कॉलनी शिव सभागृहात माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर किसन महाराज चौधरी तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनिता ऐनापुरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णू तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या सभासदांनी सहभागी होऊन आपल्या आवडत्या विषयाचे वाचन करून हा वाचन दिन साजरा केला. राजन लाखे यांनी वाचनाने माणसाचं मन कसे विकसित होते याबाबत मार्गदर्शन केले.

किसन महाराज चौधरी यांनी ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे दाखले देऊन वाचनाने मनुष्याचे तन-मन व जीवन कसे समृद्ध होते. हे अतिशय सुंदर पद्धतीने सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवले. ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तात्याबा तोरसे, राजेंद्र परदेशी, रवींद्र पंडित, रमेश रासेकर, कृष्णा कळसकर, मच्छिंद्र शेलार, कुमुदिनी घोडके व महाराष्ट्र साहित्य परिषद पिं.चि शाखेच्या कार्यवाह माधुरी मंगरूळकर, जयश्री श्रीखंडे, प्राची कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. विष्णू तांदळे यांनी प्रास्ताविक केले. गणेश विपट यांनी सूत्रसंचालन केले. विनिता ऐनापुरे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.