वाकड येथे सजली संगीताची सुरेल मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकड येथे सजली संगीताची सुरेल मैफल
वाकड येथे सजली संगीताची सुरेल मैफल

वाकड येथे सजली संगीताची सुरेल मैफल

sakal_logo
By

वाकड, ता. २४ : माजी नगरसेवक संदीप अण्णा कस्पटे युवा मंच आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांचा अभुतपूर्व प्रतिसाद लाभला. प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, अभिलाषा चेल्लम, सुगंधा दाते यांचे सुमधूर गायन व वाद्यवृंदांच्या बहारदार संगीत साथीने पहाटेच्या वातावरणात चैतन्य पसरले. या संगीतमय मेजवानीने दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.
स्वरश्री निर्मित व पराग माटेगावकर प्रस्तुत हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, भाजपा शहर सरचिटणीस अमोल थोरात, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेविका आरती चोंधे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, हर्षल ढोरे, संदीप नखाते, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष संकेत चौंधे, नितीन इंगवले, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन व परिसरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, वाकड-कस्पटेवस्ती, पिंपळे-निलख व विशालनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वप्नील बांदोडकर याने लोकप्रिय मराठी टीव्ही मालिकांच्या शीर्षक गीतांनी सुरूवात केली. ‘तुम जो मिल गये हो’, ‘राधा ही बावरी हरीची’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’, ‘गालावर खळी’ या गाण्यांना दोनदा वन्स मोअर आले. अभिलाषा चेल्लम यांच्या ‘हम से सनम क्या परदा’, ‘ही गुलाबी हवा’, ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या गाण्यांवर रसिकांनी ताल धरला. सुगंधा दातेने आपल्या गायकीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यानिमित्त ‘ये मेरे वतन के लोगो’ या देशभक्तीपर गीताने समारोप केला. माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी स्वागत केले. मोतीलाल ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद कस्पटे यांनी आभार मानले.