प्रतापगडाच्या उभारणीतून मिळाला इतिहासाला उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतापगडाच्या उभारणीतून
मिळाला इतिहासाला उजाळा
प्रतापगडाच्या उभारणीतून मिळाला इतिहासाला उजाळा

प्रतापगडाच्या उभारणीतून मिळाला इतिहासाला उजाळा

sakal_logo
By

वाकड, ता. २५ : प्रतापगड म्हटले की अफजलखानाची स्वराज्यावरची स्वारी आणि खानाचे निर्दालन या गोष्टी लगेच डोळ्यासमोर येतात. १६५९ मध्ये महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखान रुपी राक्षसाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला. या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळावा, या हेतूने थेरगावातील आनंद पार्क मित्र मंडळाने यंदा प्रतापगडाची प्रतिकृती साकारून माहितीही दिली आहे.
गिरीदुर्ग प्रकारातील प्रतापगडाची उंची १०८० मीटर (३५५६ फूट), मुख्य किल्ला आणि बाले हे किल्ल्याचे दोन भाग, स्थापना १६५६, प्रतापगडावर गोमुखी बांधणीचा प्रवेशद्वार, बालेकिल्ला, चिलखती बुरूज, भवानी मंदिर, माची, केदारेश्वर मंदिर, राजमाता जिजाबाई यांचा वाडा, दिंडी दरवाजा इत्यादी प्रेक्षणीय आहे, अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत
प्रथमेश गोपाळ, आशुतोष बांद्रे, अभिषेक राजमाने, प्रथमेश रेडेकर, साहिल परवे, प्रतीक गोपाळ, वैभव जठार यांच्यासह आनंद पार्क मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हा किल्ला साकारला आहे.