दिव्यांग, अनाथ अन निराधारांची दिवाळी अविस्मरणीय स्व. बाबुराव पवार सोशल फाउंडेशन व मल्हार प्रतिष्ठानचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग, अनाथ अन निराधारांची दिवाळी अविस्मरणीय 
स्व. बाबुराव पवार सोशल फाउंडेशन व मल्हार प्रतिष्ठानचा उपक्रम
दिव्यांग, अनाथ अन निराधारांची दिवाळी अविस्मरणीय स्व. बाबुराव पवार सोशल फाउंडेशन व मल्हार प्रतिष्ठानचा उपक्रम

दिव्यांग, अनाथ अन निराधारांची दिवाळी अविस्मरणीय स्व. बाबुराव पवार सोशल फाउंडेशन व मल्हार प्रतिष्ठानचा उपक्रम

sakal_logo
By

वाकड, ता. २८ : ताथवडे येथील स्व. बाबुराव उर्फ आण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन व मल्हार प्रतिष्ठानच्या माध्यमातून पै. सचिन पवार यांनी समाजापुढे एक आगळा आदर्श उभा केला आहे. ताथवडे, पुनावळे, काळाखडक, गणेशनगर, थेरगाव परिसरातील अंध-अपंग, विधवा महिला, निराधार व गरीब, गरजू अशा सुमारे तीनशे कुटुंबांना मोफत दिवाळीचे राशन किट वाटप करण्यात आले. किटसोबत आर्थिक मदत अन एक रोपटे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
दिवाळीनिमित्त नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र, शिधा वाटपातील विसंगती, योग्य समन्वयाचा अभाव, झालेला विलंब यामुळे किटच्या आशेवर विसंबलेल्या अनेक गरजू कुटुंबांच्या हातात ऐन दिवाळीतही शिधा न पडल्याने त्यांची घोर निराशा झाली होती. तर महापालिका निवडणुकीची अनिश्चितता यामुळे इच्छुकांनीही यंदा हात वर केले. हाच धागा पकडून पवार यांनी गरजूंना दिवाळीची भेट म्हणून किट देण्याची कल्पना सुचली. त्यांनी दर्जेदार शिधा, साहित्याचे किट तयार केले. परिसरातील गरजूंची माहिती घेत त्यांना दिवाळीची अभूतपूर्व भेट सुपूर्त केली.


समाजात नेहमीच दुर्लक्षित असलेल्या आपल्या माणसांची दिवाळी आनंदी, सुखमय व गोड करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला. शेकडो कुटुंबातील अंध-अपंग, विधवा, वयोवृद्ध निराधार कुटुंबातील महिला-पुरुषांचा आनंद एक वेगळेच समाधान देऊन गेले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्याने केलेल्या कामाचे सार्थक झाले.
- पै. सचिन पवार
संस्थापक अध्यक्ष, स्व.बाबुराव पवार सोशल फाउंडेशन व मल्हार प्रतिष्ठान
-------------------------------------------------------------
फोटो ः 02774