थेरगावातील पाणीपुरवठा नियमित करावा; आयुक्तांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेरगावातील पाणीपुरवठा नियमित करावा; आयुक्तांकडे मागणी
थेरगावातील पाणीपुरवठा नियमित करावा; आयुक्तांकडे मागणी

थेरगावातील पाणीपुरवठा नियमित करावा; आयुक्तांकडे मागणी

sakal_logo
By

वाकड, ता. १४ : थेरगाव परिसर गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झाला असून रहिवाशांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित होणं गरजेचं असताना एक दिवसा आड सुरू असणारा पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे. माजी शिक्षण मंडळ सभापती व नगरसेविका मनिषा पवार यांनी या मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. पवार नगर, पडवळ नगर, शिवतीर्थ नगर, श्रीकृष्ण कॉलनी, सुंदर कॉलनी, साईनगर, संभाजीनगर, अशोका सोसायटी, कैलास नगर, दगडू पाटील नगर, संदीप नगर, जगताप नगर, ममता, एकता, समता कॉलनी, जय मल्हार नगर, राजगुरुनगर, ड्रायव्हर कॉलनी व इतर थेरगावातील परिसरात नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना कळविले असता अधिकारी वरिष्ठांचे कारण देऊन जबाबदारी झटकून मोकळे होतात ही बाब अत्यंत गंभीर असून करदात्या नागरीकांनी कोणाकडे दाद मागायची हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आपणांस विनंती आहे की, प्रशासक या नात्याने तत्काळ संबंधितांना आदेश देऊन थेरगाव परिसरातील दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत व नियमित करण्याच्या सूचना आपण द्याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.