अश्विनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिनानिमित्त फन फेअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अश्विनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये
बालदिनानिमित्त  फन फेअर
अश्विनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिनानिमित्त फन फेअर

अश्विनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिनानिमित्त फन फेअर

sakal_logo
By

वाकड, ता. १७ : ताथवडे येथील अश्विनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने फन फेअरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. पालकांनीही सक्रिय सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. सोबतीला वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉल लावलेले होते.
विद्यार्थ्यांनी गाणी, नृत्य, तबला, हार्मोनियम वादन, विनोदात्मक कथानकं, काव्य वाचन, बोधपर गोष्टी आदींचे सादरीकरण केले. विविध बौद्धिक खेळांच्या माध्यमातून त्यांची बौद्धिक क्षमता पडताळण्यात आली.
तीन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा समन्वय नसल्याने शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान झाले. शिक्षणासाठीची ऑनलाईन पद्धत तितकी प्रभावी ठरली नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम झाला. सध्या मागील उणिवा भरून काढण्यास वेळ लागत आहे. शाळेत अभ्यासक्रमासोबत शारीरिक शिक्षणाचे धडे देखील प्रभावीपणे गिरवता येतात, असे शाळेचे चेअरमन सचिन पवार यांनी सांगितले.

फोटोः 02866