उद्यान परिवारच्या वतीने उद्यानात स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यान परिवारच्या वतीने उद्यानात स्वच्छता मोहीम
उद्यान परिवारच्या वतीने उद्यानात स्वच्छता मोहीम

उद्यान परिवारच्या वतीने उद्यानात स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

वाकड, ता. २४ : थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात उद्यान परिवार या व्यायामप्रेमी ग्रुपच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण उद्यान परिसरातील कचरा संकलित करून आठवड्यातून एक दिवस व्यायामाबरोबर स्वच्छता या उपक्रमाचा संकल्प केला.
उद्यान परिवार ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून व्यायामासाठी प्रसिद्ध आहे. ग्रुपमधील सुमारे ८० सदस्य स्वयंस्फूर्तीने दररोज पहाटे उद्यानात व्यायामाला हजेरी लावतात. मात्र, सध्या हिवाळा असल्याने ते इतरांनाही व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देऊन उद्यानात आणतात. त्यामुळे सध्या तरुण आणि ज्येष्ठ सदस्यांनी उद्यान भरून जात आहे. व्यायामासाठी सदस्यांची व नागरिकांची गर्दी होत असल्याने व्यायामाबरोबर स्वच्छता अशी संकल्पना उद्यान ग्रुपला सुचली. त्यानुसार सर्वांनी व्यायाम आटोपून हातात झाडू, खराटा घेतला.
या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसिडर गणेश बोरा यांनी सर्वांना मार्गदर्शन करत स्वच्छ अभियानाची माहिती दिली. हरीश मोरे, विष्णू तांदळे, लक्ष्मण पिलावरे, दत्ता राऊत, तात्या घनतोडे, जगन्नाथ फडतरे, संजय मातेरे, संजय काटे व अन्य अनेक महिलांनी संपूर्ण उद्यान स्वच्छ केले.