प्रज्ञा विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रज्ञा विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष
प्रज्ञा विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष

प्रज्ञा विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष

sakal_logo
By

वाकड, ता. २८ : गणेश नगर थेरगाव येथील प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रज्ञा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगणकाचे सखोल ज्ञान घेता यावे, डिजिटल शिक्षण मिळावे यातूनच त्यांचा तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर कडे ओढा व कल वाढवा या हेतूने भोसरी लाइन्स क्लबच्या वतीने संगणक कक्ष (लॅब) स्थापन करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस भोसरी लाइन्स क्लबचे अध्यक्ष नीलेश पाटील व प्रज्ञा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोरख गवळी, संचालिका भारती गवळी यांच्या हस्ते कक्षाचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी तू बुद्धी दे, तू तेज दे! ही सामूहिक प्रार्थना गायली. गोरख गवळी यांनी शाळेची सुरवात अन सध्याची प्रगती याचा आढावा घेतला. राजेश काळे म्हणाले,‘‘ शाळेला पाच संगणक संच दिल्याचे समाधान आहे. अध्यक्षीय भाषणात नीलेश पाटील म्हणाले,‘‘ तुम्हाला दिलेल्या संगणकाचा सखोल अभ्यास करून भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर बना व देशाचे नाव उज्वल करा.’’ संगीता रोकडे, मंगल सोनकांबळे, स्वीटी कांबळे, संगीता भालके, रूपाली मिरगणे, यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. पल्लवी वाघ यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी बी. एम. जोशी, प्रमोद चौधरी, राजेश हिंदलेकर, अनिल झोपे, अशुल शर्मा, राजेंद्र काळे, सुवर्णा तापकीर, के. डी. कुलकर्णी, विजय किल्लेदार, राखी झोपे, दिलीप काकडे, प्रथमेश काळे, प्रसिद्धी काणेकर, प्रज्ञा कांबळे, पूजा खरात, आम्रपाली गायकवाड उपस्थित होते.