अज्ञातांनी बंद कचरा डेपोला लावलेली आग, माण ग्रामपंचायतने तत्काळ विझवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अज्ञातांनी बंद कचरा डेपोला लावलेली आग, माण ग्रामपंचायतने तत्काळ विझवली
अज्ञातांनी बंद कचरा डेपोला लावलेली आग, माण ग्रामपंचायतने तत्काळ विझवली

अज्ञातांनी बंद कचरा डेपोला लावलेली आग, माण ग्रामपंचायतने तत्काळ विझवली

sakal_logo
By

माणमधील कचरा डेपोला आग
ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने शमवली

हिंजवडी, ता. २ : माण (ता. मुळशी) परिसरात बंद असलेल्या डंपिंग ग्राऊंडवरवरील कचऱ्याला अज्ञातांनी आग लावली. त्यामुळे आगीचे व धुराचे लोळ सर्वत्र पसरले होते. माण ग्रामपंचायतीला घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
पुणे जिल्हा परिषदेचे स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार व विविध ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून कार्यवाही करण्याबाबत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. तीन जेसीबी, एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब, दोन पाण्याचे टँकर यांच्या मदतीने ही आग विझवण्यात यश आले.
माण ग्रामपंचायतीने हे डंपिंग ग्राऊंड फार पूर्वीच बंद केले असून, गावामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. या बंद केलेल्या कचरा डंपिंग ग्राऊंडबत योग्य उपाय योजना करण्यासाठी लवकरच टेंडर काढणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, सरपंच अर्चना आढाव यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पंडित गवारे, प्रदीप पारखी, प्रशांत पारखी, विजय भोसले, शुभांगी भोसले, अरुणा लोखंडे, सचिन आढाव तसेच द क्लिफ सोसायटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.


माण : आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी.
फोटो ः 02932, 02933