मनविसेच्या शहर कार्यकारिणी जाहिरः अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनविसेच्या शहर कार्यकारिणी जाहिरः
अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
मनविसेच्या शहर कार्यकारिणी जाहिरः अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

मनविसेच्या शहर कार्यकारिणी जाहिरः अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

sakal_logo
By

वाकड, ता. २३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची नियुक्ती गुरुवारी (ता.२२) करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. ठाकरे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनविसेचे प्रदेश सचिव आशिष साबळे-पाटील, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनिकेत प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.
मनविसेचे शहर कार्यकारिणी पुढील प्रमाणे:- शहर सचिव-अक्षय नाळे, चिंचवड उपशहराध्यक्ष-सिद्धेश सोनकवडे, विकास कदम, भोसरी उपशहराध्यक्ष-प्रतीक शिंदे, पिंपरी उपशहराध्यक्ष-ओंकार पाटोळे, पिंपरी विभाग अध्यक्ष-सुमित कलापुरे, पिंपरी उपशहराध्यक्ष-आकाश लांडगे, भोसरी विभाग अध्यक्ष-मयूर हज़ारे, भोसरी विभाग सचिव-अक्षय खामकर, पिंपरी विभाग सचिव-किरण पाटील अनिकेत बलकवडे, चिंचवड विभाग अध्यक्ष-आकाश पांचाळ,