कन्याकुमारीत युवा नेतृत्व विकसन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कन्याकुमारीत युवा नेतृत्व विकसन शिबिर
कन्याकुमारीत युवा नेतृत्व विकसन शिबिर

कन्याकुमारीत युवा नेतृत्व विकसन शिबिर

sakal_logo
By

वाकड, ता. २६ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा नेतृत्व विकसन शिबिर व सूर्यनमस्कार महायज्ञात महाराष्ट्र व गोवा प्रांतातील २७ जिल्ह्यांतील मिळून ९४० वरिष्ठ महाविद्यालयीन युवक-युवती सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र प्रांताच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील १५ जण यात सहभागी झाले आहेत. कन्याकुमारी येथील विवेकानंद पूरम् येथे शनिवारी सुरुवात झाली. आज (ता. २७) डिसेंबर दुपारपर्यंत चालणाऱ्या या शिबिर केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष के. बालकृष्णन यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी केंद्राचे राष्ट्रीय महासचिव भानुदास धाक्रस, शिबिर प्रमुख सुनील कुलकर्णी, शिबिर अधिकारी मदगोंडा पुजारी, पिंपरी-चिंचवडच्या प्रमुख आरूणा मराठे आदी उपस्थित होते. तसेच जयदेव म्हमाणे, अविनाश गोखले, पुंडलिक मते यांनी व्यवस्था व सुरक्षा या दोन विभागाची जबाबदारी पार पाडली.

यात महाराष्ट्र व गोवा प्रांतातील २७ जिल्ह्यांतील ९४० वरिष्ठ महाविद्यालयीन युवक-युवती सहभागी झाले आहेत. या शिबिरार्थींनी रविवारी सकाळी ६ वाजता सामूहिक १०१ सूर्यनमस्कार घालून सूर्यनारायणाला अर्घ्य दिले. दरम्यान, या उपक्रमासाठी केंद्र कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र व गोवा प्रांतातील महाविद्यालयांशी संपर्क केला. वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वराज्य ७५ स्वामी विवेकानंद आणि युवा या पुस्तकावर परीक्षा दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकदिवसीय शिबिर केले. तसेच दर रविवारी चाललेल्या स्वाध्याय वर्ग, केंद्र वर्ग या केंद्र कार्यपद्धतीतून युवा नेतृत्व विकसन शिबिरासाठी ९४० युवक-युवतींची निवड झाली आहे.