विद्यार्थ्यांच्या खात्यावर ‘डीबीटी’ची रक्कम जमा करा ‘मनविसे’चा आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या खात्यावर 
‘डीबीटी’ची रक्कम जमा करा

‘मनविसे’चा आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांच्या खात्यावर ‘डीबीटी’ची रक्कम जमा करा ‘मनविसे’चा आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांच्या खात्यावर ‘डीबीटी’ची रक्कम जमा करा ‘मनविसे’चा आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

वाकड, ता. ३१ : महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेण्यासाठी ‘डीबीटी’चे पैसे त्वरित द्यावेत. पुढील महिन्यात ‘डीबीटी’ची रक्कम ही विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून, त्यात जमा करावी. अन्यथा पुढील महिन्यात पैसे जमा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने
शिक्षण मंडळास दिला आहे.
मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, शहराध्यक्ष अनिकेत प्रभू यांनी याबाबत निवेदन देत विविध मागण्या केल्या आहेत. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार सांभाळणाऱ्या तीन अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. अर्धे शैक्षणिक वर्षे संपले तरी १८ हजार विद्याथ्यांची बँक खाते उघडण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. खाते नसल्याने शैक्षणिक साहित्यासाठी मिळणारा अनुदानापासून (डीबीटी) हजारो विद्यार्थी वंचित आहेत. विद्यार्थ्यांना मोफत साहित्य देण्याचा नारा दिला जात असला तरी तो कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
शाळा १३ जून पासून सुरू झाल्या आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांना महापालिकेच्यावतीने दोन शालेय गणवेश, एक पीटी गणवेश, एक स्वेटर, एक रेनकोट, दप्तर, वह्या, पुस्तके, बूट आदी साहित्य दिले जाते. केवळ गणवेश, स्वेटरचे वाटप करण्यात आले आहे. निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी अद्याप १३ प्रकारच्या आणि विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले नाही, त्याचे पैसे (डीबीटी) विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र डीबीटीचे पैसेही मिळाले नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर हेमंत डांगे, अनिकेत प्रभू, प्रतीक शिंदे, ओंकार पाटोळे, अक्षय नाळे, सुमीत कलापुरे, अक्षय खामकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.