Tue, June 6, 2023

मुंजोबा मंडळाची भव्य पदयात्रा
मुंजोबा मंडळाची भव्य पदयात्रा
Published on : 20 February 2023, 11:43 am
मुंजोबा मंडळाची पदयात्रा
वाकड : येथील मुंजोबा मंडळाने पदयात्रा काढून, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. लहान मुलांना खाऊचे वाटप झाले. वाकड ते भूमकर चौक अशी पदयात्रा काढण्यात आली. या फेरीत अनेकांनी महाराजांची वेशभूषा साकारली होती. भगवे झेंडे हातात घेऊन जयघोष करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय होती. मुंजोबा मित्र मंडळाच्या वतीने लोकशाहीचा चौथास्तंभ असलेले पत्रकार बांधव व सामाजिक सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिस बांधवांचा सन्मान करण्यात आला. दोन हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
फोटोः 03304