शिव कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिव कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
शिव कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

शिव कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

sakal_logo
By

वाकड, ता. ०१ ः गणेश नगर, थेरगाव येथील शिव कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत ग्रंथ पारायणाचे आयोजन केले होते. जगद्‍गुरु श्री. संत तुकाराम महाराज जीवन चरित्र सोहळ्याची गणेश महाराज कारळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. सुवासिंनीनी रस्त्यांवर रांगोळीच्या पायघड्या घालून जागोजागी पालखीचे स्वागत व पूजन केले. पहाटे महा रुद्राभिषेक, होम हवन, दुपारी सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सायंकाळी पालखी व महाआरती झाली.
सप्ताहात पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी महिला भजनी मंडळांचे भजन, संत तुकाराम महाराज जीवन चरित्र, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद, रात्री सार्वजनिक जागर असा नित्य दिनक्रम होता. रामलिंग महाराज मोहिते यांच्या कीर्तनाने सप्ताहाला सुरुवात झाली. काल्याच्या कीर्तनानंतर सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मोरेश्वर महिला, महादेव कॉलनी माऊली, स्वरांजली महिला, शिवांजली महिला, विठ्ठल-रुक्मिणी महिला, शिव कॉलनी इत्यादी भजनी मंडळांनी भजन सेवा केली. तर प्रमोद महाराज पवार, संतोष महाराज पायगुडे, पाडुंरंग महाराज शितोळे, भगत महाराज, महावीर महाराज सूर्यवंशी यांची कीर्तन सेवा झाली. शिवकॉलनी मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.