Wed, May 31, 2023

एस. पी. स्कूलमध्ये दंत चिकित्सा शिबिर
एस. पी. स्कूलमध्ये दंत चिकित्सा शिबिर
Published on : 16 March 2023, 9:10 am
वाकड, ता. १६ : येथील एस. पी. स्कूलमध्ये डॉ. डी. वाय पाटील दंत हॉस्पिटल पिंपरी विभाग यांच्या सौजन्याने शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाचशे विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. दातांची निगा कशी राखावी, कोणती काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात आले. असिस्टंट प्रोफेसर डॉ. लामिया अफगाण, डॉ. स्नेहा कल्पे यांच्या पथकाने केली. यावेळी शाळेच्या सचिव अर्चना बोडके, अक्षदा बोडके, मुख्याध्यापिका चंदा आतकरी आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी राम डोके यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रा. अंकुश बोडके यांनी आभार मानले.