सातबाऱ्यावर घरमालकांचे नाव 
लावण्याबाबत लक्षवेधी मांडा
अजित पवार यांना साकडे, आयुक्त दबावाखाली असल्याचा आरोप

सातबाऱ्यावर घरमालकांचे नाव लावण्याबाबत लक्षवेधी मांडा अजित पवार यांना साकडे, आयुक्त दबावाखाली असल्याचा आरोप

वाकड, ता. २२ : ज्या व्यक्तींनी प्राधिकरणातील जागा खरेदी केल्यात, त्या जागांच्या सातबाऱ्यावर घर मालकांचे नाव लावण्यासाठी कायदेशीर पूर्तता करण्याचे आपण आदेश देऊनही, दोन वर्षे उलटून गेले तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही प्रक्रिया केली नाही. महापालिका आयुक्त व सर्व अधिकारी भाजपच्या दबावाला बळी पडत आहेत. याबाबत आपणच ४विधानसभेत लक्षवेधी लावून, या भागातील सर्व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे केली आहे.
महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी पवार यांना विनंती करत याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अजित पवार पालकमंत्री असताना २६ जानेवारी २०२१ रोजी महापालिका आयुक्त, प्राधिकरण व पीएमआरडीए अधिकाऱ्यांबरोबर सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत
प्राधिकरणातील जागांचे सातबारे ज्या व्यक्तींनी जागा खरेदी केली आहे. त्यांच्या सात बाऱ्यावर घरमालकांचे नाव लावण्यासाठी कायदेशीर पूर्तता करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या निर्णयामुळे थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, वाकड, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, रावेत या भागातील दीड लाख कुटुंबांना दिलासा मिळणार होता. मात्र, अद्याप तसे झाले नाही.

फोटोओळ
थेरगाव : सातबाऱ्यावर घरमालकांचे नाव लावण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडण्याच्या मागणीचे निवेदन अजित पवार यांना देताना संतोष बारणे
फोटो ः 03544

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com