
पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये २४ विद्यार्थ्यांची निवड
हिंजवडी, ता. २४ : मारुंजी येथील अलार्ड कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय व टेककेअर मेडिकल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने डी.फार्म, बी.फार्म आणि एम.फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात २४ उमेदवारांची निवड झाली. त्यापैकी १० विद्यार्थी अलार्ड कॉलेज ऑफ फार्मसीचे आहेत.
पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये अॅप्टिट्यूड आणि एचआर राउंड घेण्यात आले. पूल कॅम्पस भरती प्रक्रियेत २० पेक्षा जास्त संस्थांमधील एकूण १२४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २४ उमेदवारांची निवड करण्यात आली. यातील दीपा मुदलियार, सुजय सूर्यवंशी, आकांक्षा खोंडका, वैष्णवी शिंदे, रणजित माने, पूनम नरुटे, ब्रून्था नाडेर, संदीप पाल, प्रीती निकाजी, सिद्धी सरवदे या अलार्ड कॉलेज ऑफ फार्मसीच्या दहा विद्यार्थ्यांची मेडिकल ट्रान्सक्रिप्शन या पदासाठी निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. आर. यादव, सचिव डॉ. आर. एस. यादव, आणि प्राचार्या डॉ. सोनिया सिंग यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. सोनिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल अधिकारी सपना नागरे यांनी पूल कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन केले होते.