‘इंडिक टेल्स’वर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इंडिक टेल्स’वर 
कारवाईची मागणी
‘इंडिक टेल्स’वर कारवाईची मागणी

‘इंडिक टेल्स’वर कारवाईची मागणी

sakal_logo
By

वाकड, ता. १ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ हिंदू पोस्ट संकेतस्थळावर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतीने पोलिस आयुक्त विनायक चौबे यांच्याकडे करण्यात आली.
महात्मा फुले समता परिषदेची शहर कार्यकारिणी व शिष्टमंडळाने चौबे यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन दिले.
‘इंडिक टेल्स’ या संकेतस्थळावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी खालच्या पातळीवरचे लिखाण केले आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वर बंदी आणून, लेखकांवर सक्तीची कठोर कारवाई झाली पाहिजे,
अशी मागणी शहराध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भुजबळ यांनी केली.
----------------------------------