सकाळ इम्पॅक्ट   मुळा नदी खळाळून वाहू लागली, पाण्याचा विसर्ग सुरू

सकाळ इम्पॅक्ट मुळा नदी खळाळून वाहू लागली, पाण्याचा विसर्ग सुरू

सकाळ बातमीचा परिणाम

अन् मुळा नदी खळाळून वाहू लागली
हिंजवडीकर समाधानी ः मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू,

हिंजवडी, ता. ५ : आयटी पार्क हिंजवडीमधून वाहणारी मुळा नदी जणू काही महिन्यांपासून शांत झाली होती. पाण्याचा प्रवाह बंद केल्याने पाणी दूषित झाले होते. सर्वत्र दुर्गंधी सुटली होती. याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवत ‘आयटीयन्सच्या नशिबी दूषित पाणी’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. तिची दखल पाटबंधारे विभागाने घेतली व रविवारी (ता. ४) भरे (मुळशी) बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला. त्यामुळे मुळा नदी पुन्हा एकदा खळाळून वाहू लागली आहे.
हिंजवडी परिसरात दूषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या अनेक समस्या ‘सकाळ’ने निदर्शनास आणून दिल्या होत्या. या वृत्ताने खडबडून जाग्या झालेल्या पाटबंधारे विभागाने पाणी सोडले. त्यामुळे साठलेले दूषित व दुर्गंधीयुक्त हिरवे पाणी वाहून गेले. याबाबत हिंजवडीकरांनी समाधान व्यक्त करीत ‘सकाळ’चे आभार मानले.
हिंजवडीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रम साखरे यांनी याबाबत आवाज उठवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते तर खासदार सुप्रिया सुळे व आमदार संग्राम थोपटे यांच्याकडेदेखील त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे या सर्वांच्या मागणी व सूचनेनुसार पाणी सोडण्यात आले.


‘‘सकाळमधील बातमीच्या दणक्याने पाटबंधारे विभागाने पाणी सोडले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दुर्गंधीदेखील कमी झाली. आता नळाला स्वच्छ पाणी येईल. मात्र, पाटबंधारे विभागाने आमच्या मागणीची, पाठपुराव्याची किंवा त्यासाठी आंदोलनाची वाट न पाहता गरजेनुसार अधून-मधून पाणी सोडल्यास आमचा हा वेळ इतर कामांसाठी कारणी लागेल.

- नंदकुमार गुत्तेकर
चेअरमन युनिट सी वन ब्ल्यू रिज सोसायटी, हिंजवडी

फोटोः 03954, WKD23A03955, WKD23A03956

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com