एमबीए ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ची दमदार सुरुवात
वाकड, ता. २०: इंदिरा विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलच्यावतीने आयोजित एमबीए कार्यक्रमाअंतर्गत १५ दिवसांच्या ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ला दमदार सुरुवात झाली. व्यवस्थापनातील दिग्गजांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरले.
या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील प्रख्यात दिग्गज आणि कॉर्पोरेट तज्ञांनी सहभाग घेतला. त्यांनी वास्तववादी, करिअर मार्गदर्शन आणि धोरणात्मक उद्योगज्ञान विद्यार्थ्यांसमोर मांडले. परस्पर संवादी सत्रांद्वारे शैक्षणिक आणि उद्योगाच्या अपेक्षांमधील दरी कमी करत विद्यार्थ्यांच्या परिवर्तनात्मक प्रवासाला चालना देणारा सूर यावेळी निघाला. या कार्यक्रमाद्वारे इंदिरा विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलने ज्ञान आणि जागतिक दृष्टिकोनाने सज्ज भविष्यातील व्यावसायिक लीडर घडविण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब केले.
प्रमुख वक्त्यांनी उद्योग क्षेत्रातील बदलते लँडस्केप, उदयोन्मुख संधी आणि स्पर्धात्मक व्यवसाय विश्वात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपले वैयक्तिक व्यावसायिक अनुभव शेअर करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि कॉर्पोरेट कारकिर्दीत उत्कृष्टता आणि नावीन्याचा ध्यास घेण्यास प्रोत्साहित केले.
प्रमुख वक्त्यांचा सहभाग
या चर्चासत्रात इंडिया जीबीएस, इकोलॅबचे वरिष्ठ टीए लीडर गिरीश कानिटकर, मास्टरकार्ड युनिव्हर्सिटी रिक्रूटमेंट ॲण्ड अर्ली टॅलेंट एंगेजमेंटचे भारतातील प्रमुख उर्विश पांडे, डेसिमल पॉइंट अॅनालिटिक्सचे चीफ पीपल ऑफिसर अरुण प्रताप सिंग, युनिव्हर्सिटी टॅलेंट अक्विझिशनचे क्रॉल स्पेशलिस्ट दीपश्री सातुर्डेकर आणि जीआयएफ ईएमईए एमव्हीए, मझारचे संचालक नेहा सूद यासारख्या मान्यवरांनी आपले विचार मांडले.
WKD25A09071