चिंताजनक! पिंपरी-चिंचवड शहरातील मृतांचा आकडा शंभरी पार

चिंताजनक! पिंपरी-चिंचवड शहरातील मृतांचा आकडा शंभरी पार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवार सायंकाळी सातपासून शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत 409 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या सहा हजार 958 झाली आहे. आज दिवसभरात 10 जणांचा मृत्यू झाला. त्यातील आठ जण शहरातील आहेत. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या 102 झाली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये सध्या दोन हजार 858 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तीन हजार 998 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 235 जणांना डिस्चार्ज मिळाला. आज शहरातील 409 आणि शहराबाहेरील 18 जण पॉझिटिव्ह आढळले. 

आज मृत झालेले रुग्ण चिंचवड (पुरुष, वय-७८), चिखली (पुरुष, वय-७५), रुपीनगर (स्त्री, वय-४७), पिंपळे गुरुव (पुरुष, वय-६६), पिंपरी गाव (पुरुष, वय-६२), पिंपरी (पुरुष, वय-७६), पिंपरी (पुरुष, वय-६५), कासारवाडी (पुरुष, वय-६०), देहुरोड (पुरुष, वय-७९), टिंगरेनगर पुणे (पुरुष, वय-६६) येथील रहिवासी आहेत.

शहरात आजपर्यंत 33 हजार 400 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 31 हजार 243 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. 24 हजार 285 जणांना संसर्ग नसल्याचे आढळून आले आहे. सध्या दोन हजार 157 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. सध्या दोन हजार 315 जण रुग्णालयात दाखल आहेत. 

पावसाळा सुरू झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं. चिं. मनपामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते, की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच, पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com