मावळातील कोरोनाबाधितांचा आकडा आज अडीचशे पार                          

मावळातील कोरोनाबाधितांचा आकडा आज अडीचशे पार                          

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी तळेगाव येथील सहा, टाकवे खुर्द येथील तीन, कामशेत व सोमाटणे येथील प्रत्येकी दोन; तर वडगाव, लोणावळा, भाजे, सुदुंबरे, सुदवडी व वराळे येथील प्रत्येकी एक अशा एकूण १९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अडीचशे पार म्हणजे २५५ झाली आहे. त्यात शहरी भागातील ९३, तर ग्रामीण भागातील १६२ जणांचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळेगाव शहरात सहा नवीन रुग्णांची भर पडल्याने तेथील रुग्ण संख्या ६८ झाली आहे. लोणावळा येथील १७, तर वडगाव येथील रुग्ण संख्या सात झाली आहे. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय १५९ रुग्णांपैकी ७६ लक्षणे असलेले, तर ८३ लक्षणे नसलेले आहेत. लक्षणे असलेल्या ७६ जणांपैकी ६१ जणांमध्ये सौम्य, तर १३ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. दोन जण अत्यवस्थ आहेत. ११९ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून, ४० जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com