मावळातील ३१ ठिकाणी पर्यटनास बंदी; ती ३१ ठिकाणे कोणती?

Tourism banned at 31 places in Maval
Tourism banned at 31 places in Maval

वडगाव मावळ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील ३१ ठिकाणी पावसाळी पर्यटनास प्रशासनाने बंदी घातली आहे. प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मावळ तालुक्यातील लोणावळा-खंडाळा या नेहमीच्या पर्यटन स्थळांप्रमाणेच आंदर, पवन व नाणे मावळातील धरणांचा परिसर, किल्ले, लेण्या व धार्मिक ठिकाणी पावसाळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतु यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पावसाळी पर्यटनास बंदी घातली आहे.
-------------
धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक; स्वतःच केली फेसबुक पोस्ट
-------------
सावधान हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग !
------------
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यापूर्वीच बंदीचा आदेश काढला आहे. तरीही हा आदेश झुगारून अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी येत असल्याचे गेल्या दोन शनिवारी व रविवारी दिसून आले. त्यामुळे पर्यटन बंदीच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी असा अहवाल तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सादर केल्यानंतर प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी नव्याने आदेश जारी केला व तालुक्यातील ३१ ठिकाणी पर्यटकांना पर्यटनास बंदीचा आदेश काढला. बंदी आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी पोलिसांना केली आहे.

पर्यटनास बंदी असलेली तालुक्यातील ठिकाणे-

  • टाकवे बुद्रुक
  • फळणे
  • माऊ
  • वडेश्वर
  • नागाथली
  • वहाणगाव
  • कुसवली
  • बोरवली
  • डाहुली
  • सावळा
  • कुसुर
  • निळशी
  • खांड
  • राजमाची
  • फणसराई
  • उधेवाडी
  • भुशी धरण व परिसर
  • पवना धरण व परिसर
  • तुंगार्ली धरण व परिसर
  • मंकी पॉईंट खंडाळा
  • घुबड तलाव
  • ड्युक्स नोज कुरवंडे
  • टायगर पॉईंट
  • लायन्स पॉईंट
  • शिवलिंग पॉईंट लोणावळा
  • घोरावडेश्वर डोंगर
  • एकविरा देवी मंदीर वेहेरगाव
  • कार्ला लेणी
  • भाजे लेणी
  • भाजे धबधबा
  • आंबेगाव धबधबा
  • लोहगड
  • विसापूर
  • तुंग
  • तिकोणा किल्ले
  • दुधीवरे प्रतिपंढरपूर मंदीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com