पुणे-नाशिक महामार्गावर बेशिस्त वाहनचालकांमुळेच वाहतूक कोंडी

Traffic jam on Pune-Nashik highway due to unruly drivers
Traffic jam on Pune-Nashik highway due to unruly drivers

मोशी(पिंपरी) : राष्ट्रीय महामार्ग व मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेल्या पुणे नाशिक महामार्गावरील भारतमाता चौकामध्ये बेशिस्त वाहनचालकांमुळेच वाहतूक कोंडी होणे ही लांब पल्ल्याचे प्रवासी व मोशीकरांसाठी नेहमीचीच डोकेदुखी झालेली आहे. 


यामुळे होतेय वाहतूक कोंडी... 

  • भारतमाता चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंग पट्टे नसणे. 
  • वाहतूकीचे नियम न पाळणारे बेशिस्त वाहन चालक  रस्त्याच्या मधोमध येऊन थांबणे. 
  • वाहतूक नियंत्रक दिवे काही प्रसंगी बंद असणे. 
  • ट्रॅफीक वाॅर्डन व पोलीस कर्मचारी यांची वाहतूकीच्या प्रमाणात संख्या कमी असणे.
  • श्री नागेश्वर महाराज चौक व भारतमाता चौकापर्यंतचे अंतर कमी असणे. 
  • त्यामुळे एका सिग्नलहून सुटताच दुसर्‍या सिग्नलला अडकणे. 
  • पुणे-नाशिक महामार्ग व देहू आळंदी बीआरटीएस रस्ता एकाच चौकात एकत्र येणे. 
  • मोशी टोल नाक्यावरील वाहनांच्या रांगा येऊन या चौकात थांबणे. 
  • वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हे होणे अपेक्षित आहे...
  • या चौकातील चारही रस्त्यांवर चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारणे. 
  • वाहतूकीच्या वेळी चारही रस्त्यांवर ट्रॅफिक वॉर्डन व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून नियुक्ती करणे. 
  • झेब्रा क्रॉसिंग ओलांडून पुढे आलेल्या वाहनांवर कारवाई करणे. 
  • विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनचालकांवर कारवाई करणे. 
  • स्थानिक सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांचे सहकार्य घेऊन चौकामध्ये स्वयंसेवकांची नियुक्ती करणे.
  • लांब पल्ल्याच्या वाहनांना उजव्या बाजूने जाण्यासाठी बॅरीकेट्स लावून मार्गीका तयार करणे.

''प्रशासन व स्थानिक सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने विविध मार्गांचा अवलंब करत या भारतमाता चौकातील वाहतूक कोंडी सुरळीत केली जाऊ शकते व आम्हा लांब पल्ल्याच्या प्रवाशांना वेळेत प्रवास उरकू शकतो.''
- रमेश थोरवे, वाहनचालक. नाशिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com