कोरोना झालेल्यांवर क्षयरोगाचे सावट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lungs

जागतिक क्षयरोग दिन येत्या गुरुवारी (ता. २४) आहे. ‘क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी गुंतवणूक करा. प्राण वाचवा’ ही या वर्षीच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे.

कोरोना झालेल्यांवर क्षयरोगाचे सावट!

पिंपरी - तुम्हाला कोरोना (Corona) होऊन गेलाय का? उपचारांसाठी (Treatment) रुग्णालयात दाखल करावे लागले होते का? कोरोनामुळे तुमच्या फुफ्फुसांची (Lungs) कार्यक्षमता कमी झालीय का? या तीनही प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असणाऱ्यांनो तुम्हाला क्षयरोगाच्या जंतूंचा (TB Germs) संसर्गाचा धोका (Danger) सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुम्ही घराबाहेर पडताना मास्क घालाच, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक क्षयरोग दिन येत्या गुरुवारी (ता. २४) आहे. ‘क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी गुंतवणूक करा. प्राण वाचवा’ ही या वर्षीच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त रुग्णांना क्षयरोगाचा धोका असल्याची माहिती क्षयरोगतज्ज्ञांनी दिली.

कोरोनामुळे काय झाले?

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंच्या व्हेरियंटने थेट मानवी फुफ्फुसांवर हल्ले केले. श्वसनमार्गाच्या खालच्या भागात ससंर्गाचे प्रमाण वेगाने वाढले. त्याचा फटका फुफ्फुसांना बसला. कोरोनामुळे काही रुग्णांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाली. तिसऱ्या लाटेतील ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग श्वसन मार्गाच्या वरच्या भागात असल्याने बहुतांश रुग्णांच्या फुफ्फुसांना धोका निर्माण झाला नाही.

कसा वाढला धोका?

देशातील ४० टक्के लोकसंख्येला क्षयरोगाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी काही रुग्णांचे निदान झालेले नाही. अशा क्षयरुग्णाच्या थुंकीतून जंतूंचा प्रसार होतो. कोरोनामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झालेल्या रुग्णांना क्षयरुग्णांच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे उपचारांना मर्यादा पडतात. या पार्श्वभूमीवर कोरोनातून बऱ्या झालेल्या विशेषतः उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना क्षयरोगाचा संसर्ग होऊ नये, याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे, अशी देशाच्या क्षयरोगाच्या पश्चिम भारताच्या कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय गायकवाड यांनी दिली.

प्रत्येक श्वास हवा सुरक्षित

कोरोनाबरोबरच आता क्षयरोगाच्या जंतूंना प्रतिबंध करण्यासाठी आपण घेत असलेला प्रत्येक श्वास सुरक्षित पाहिजे. त्यासाठी घराबाहेर पडताना मास्क आवश्यकच आहे. मास्कमुळे क्षयरुग्णाकडून रोगजंतूंना प्रसार होणार नाही. मास्क घातलेल्या नागरिकाला रोगजंतूंचा संसर्ग होण्यापासून प्रतिबंध करता येईल, असे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले. माणूस प्रत्येक मिनिटाला १२ श्वास घेतो. एका तासामध्ये ७२० ते ८०० श्वास घेतला जातात. दिवसभरात १७ ते १८ श्वास माणूस घेतो. त्यामुळे प्रत्येक श्वास सुरक्षित असला पाहिजे, असा आग्रह डॉ. गायकवाड यांनी धरला आहे.

क्षयरोग आणि फुफ्फुस

दिवस-रात्री कार्यरत असलेले अवयवांपैकी फुफ्फुस हे एक आहे. शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक प्राणवायू शरीरात घेण्याचे कार्य फुफ्फुस करते. क्षयरोगाचे रोगजंतू श्वसनावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यातून हृदयाचा धोका वाढतो.

देशाला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी ‘राष्ट्रीय क्षयरोग मुक्त कार्यक्रम’ २०१८ पासून हाती घेण्यात आला आहे. त्याची सुरवात स्वतःपासून करायला हवी. स्वतःला क्षयरोगापासून दूर ठेवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपले कुटुंब, शहर, राज्य आणि अंतिमतः देश क्षयरोग मुक्त होईल.

- डॉ. संजय गायकवाड, अध्यक्ष, क्षयरोग टास्क फोर्स, पश्चिम विभाग

काय केले पाहिजे?

  • प्रदूषित हवेत फिरू नका

  • गर्दीत जाणे टाळा

  • सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करा

  • दीर्घ श्वसनाचे व्यायाम करा

जगाच्या तुलनेत देशातील क्षयरोग

  • २७ टक्के - क्षयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण

  • ३१ टक्के - क्षयरोगाने होणारे मृत्यू

  • २४ टक्के - मल्टी ड्रग्ज रेजिटन्स रुग्ण

  • ३१ टक्के- लहान मुलांमध्ये होणारा क्षयरोग

Web Title: Tuberculosis Corona Victims Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top