पिंपरी : तब्बल एकवीस महिन्यांनंतर कोरोना रुग्ण शंभरच्या आत

कोरोनाबाबत गेल्या दोन दिवसांपासून शहरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २३ महिन्यांनंतर प्रथमच शंभरच्या आत आली आहे.
Corona Patient
Corona PatientSakal
Summary

कोरोनाबाबत गेल्या दोन दिवसांपासून शहरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २३ महिन्यांनंतर प्रथमच शंभरच्या आत आली आहे.

पिंपरी - कोरोनाबाबत (Corona) गेल्या दोन दिवसांपासून शहरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. सक्रिय रुग्णांची (Patient) संख्या २३ महिन्यांनंतर प्रथमच शंभरच्या आत आली आहे. त्यातही रुग्णालयांत केवळ १३ जण उपचार घेत आहेत. सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७० आहे.

कोरोनाचा कमी झालेला संसर्ग, प्रतिबंधक लसीकरणामुळे वाढलेली प्रतिकारशक्ती आणि मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचे पालन आदी कारणांमुळे कोरोना आटोक्याच आल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही आता शंभरच्या आत आली आहे. गुरुवारी (ता. १७) पाच व शुक्रवारी (ता. १८) १२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, दोन्ही दिवशी अनुक्रमे ३३ व ३४ असे ६७ जण बरे झाले आहेत. सध्या ७० सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ५७ जण गृहविलगीकरणात आहेत.

१९ एप्रिल २०२० रोजी रुग्णसंख्या ६१ झाली होती. त्या वेळी भितीचे वातावरण होते. लॉकडाऊनची स्थिती होती. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या तीन लाख ५९ हजार ७१ झाली आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या तीन लाख ५५ हजार १०८ झाली आहे. आजपर्यंत शहरातील चार हजार ६२४ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सध्या आठ मेजर व ३७६ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ७७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. २७४ जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत ३४ लाख ७२ हजार २५९ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com