'वायसीएम'च्या परिचारिकांचे दोन तास कामबंद आंदोलन 

covid.jpg
covid.jpg

पिंपरी : परिचारिकांची वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागातील सहा हजार रिक्त पदे तातडीने भरावी. कंत्राटीकरण करू नये. परिचारिकांना रोटेशननुसार सात दिवस कोविड ड्यूटी व त्यानंतर सात दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी. कोविड ड्यूटी चार तासांच्या शिफ्टमध्ये असावी, अशा परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यांचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्यावतीने राज्यव्यापी दोन तास कामबंद आंदोलन आज (ता.26) करण्यात आले. या आंदोलनात ""हमारी युनियन...हमारी ताकत '' अशा घोषणा देत महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सर्व परिचारिका, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा सविता निगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. प्रशासनाला कळवूनच सकाळी दोन तास रुग्णालयातील कामकाज बंद ठेवले होते. या आंदोलनात परिचारिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रशासनाचा निषेध नोंदवला. 

काय आहेत परिचारिकांच्या मागण्या- 
कोविड बाधित व संशयित रुग्णाच्या सेवेत कार्यरत परिचारिकांना दर्जेदार पीपीई किट , एन-95मास्क, इतर साहित्य त्वरित मिळावे. कोविड ड्यूटीनंतर परिचारिकांची स्वॅब टेस्ट करण्यात यावी. हृदयरोग, मधुमेह, श्‍वसनसंस्थेचे आजार व इतर गंभीर आजार असलेल्या परिचारिकांना कोविड ड्यूटी मध्ये सूट मिळावी. कोविड रुग्णास सेवा देताना मृत्यू आल्यास शासनाने घोषित केलेली लाख रुपये विम्याची रक्कम त्वरित मिळावी तसेच वारसास शासकीय सेवेत नोकरी द्यावी. 

परिचारिका बाधित झाल्यास त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी राखीव जागा असाव्यात. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कोविड रुग्णास सेवा देणाऱ्या परिचारिकांना रुपये दैनंदिन भत्ता देण्यात येतो, त्याप्रमाणे दैनंदिन भत्ता देण्यात यावा. कोविड सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासनाने विनाविलंब समिती गठित करावी.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com