esakal | भोसरीत घरफोडी; पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास 
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत घरफोडी; पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास 

दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात शिरलेल्या चोरट्याने पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना भोसरी येथे घडली.

भोसरीत घरफोडी; पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात शिरलेल्या चोरट्याने पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना भोसरी येथे घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुधीर माधव टकले (रा. निसर्ग प्राईड अपार्टमेंट, सेक्‍टर 3, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे शुक्रवारी (ता. 2) घराला कुलूप लावून जुन्नर येथील त्यांच्या मूळगावी आळे येथे होते. दरम्यान, अज्ञात चोरटा दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात शिरला. कपाटातील एक लाख 40 हजारांच्या सोनसाखळीसह 32 हजारांचे इतर दागिने व पंधरा हजारांची रोकड असा एकूण एक लाख 87 हजारांचा ऐवज लंपास केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फिर्यादी हे घरी परतल्यानंतर रविवारी (ता. 4) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत भोसरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासह नागारिकांकडे चौकशी केली जात आहे. अधिक तपास सुरू आहे.