पिंपरी-चिंचवड : दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनाही कोरोना, आता पोलिसांची रुग्ण संख्या... 

टीम ई सकाळ
सोमवार, 29 जून 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी (ता. 29) समोर आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी (ता. 29) समोर आले. त्यामुळे आयुक्तालयातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सतरावर गेली आहे. यातील 13 पोलिस कोरोनामुक्त झाले असून, ड्युटीवर हजरही झाले आहेत. सध्या चार अधिकारी, कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

 हेही वाचा-  Breaking : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन वरिष्ठ निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये तिर्थक्षेत्रातील एका पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकाचा समावेश आहे. अहवाल आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. 

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड : आज दुपारपर्यंत १५७ नवे पॉझिटिव्ह, तर बरे झालेले रुग्ण म्हणतायेत

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, मागील काही दिवसांपासून पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने पिंपरी-चिंचवड पोलिस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आयुक्तालयातील एकूण कोरोनाबाधित सतरा अधिकारी, कर्मचार्यांपैकी तेरा जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या चार पोलिस अधिकारी, कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील दोन अधिकारी सोमवारी तर इतर दोनजण मागील दोन दिवसांत पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'ते' अधिकारी, कर्मचारी ड्युटीवर हजर

कोरोनाचा संसर्ग झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आयुक्तालयासह विविध ठाण्यातील पोलिसांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तेरा अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यात आले. विश्रांती नंतर पूर्ण बरे होऊन ते अधिकारी, कर्मचारी पुन्हा ड्युटीवर हजर झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two senior police inspectors were found corona positive at pimpri chinchwad