चोरलेल्या दुचाकी 'ते' दिवसभर फिरवायचे अन् रात्री... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

दोन सराईत दुचाकी चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले.

पिंपरी : चोरलेल्या दुचाकी दिवसभर फिरवायच्या, रात्री त्या भोसरीतील पुलाखालील पार्किंगमध्ये उभ्या करून घरी जायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी दुचाकी फिरवायची. यासह काही दुचाकी कागदपत्रांविना विकायच्या, असा उद्योग करणाऱ्या दोन सराईत दुचाकी चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्वप्निल राजू काटकर (वय 19, रा. दिघी रोड, आदर्शनगर, भोसरी) व राहुल मोहन पवार (वय 19, रा. मधुबन सोसायटी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी
अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरीतील आळंदी रोड येथील पुलाखाली दोघे जण दुचाकीसह संशयितरित्या थांबले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता, त्या चोरल्याचे त्यांनी सांगितले. सखोल चौकशी केल्यावर आणखी आठ दुचाकी चोरल्याचे समोर आले. आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडील चोरीच्या चार लाख रुपये किंमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. या दुचाकी आरोपींनी भोसरी, भोसरी एमआयडीसी, खडकी व सांगवी परिसरातून चोरल्याचे उघड झाले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात तीन, भोसरी व खडकी ठाण्यात प्रत्येकी दोन; तर एमआयडीसी भोसरी ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तर उर्वरित दोन दुचाकींबाबतचा तपास सुरू आहे. यातील आरोपी हे दुचाकी चोरायचे व दिवसभर दुचाकी फिरवून त्या दुचाकी भोसरी येथील पुलाखाली असलेल्या पार्किंगमध्ये लावून घरी जात असे. तसेच, काही दुचाकी आरोपींनी त्यांच्या ओळखीचे लोकांना कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून विक्री केल्याचेही उघड झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हीकारवाई युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, कर्मचारी रविंद्र गावंडे, सचिन उगले, नितीन खेसे, गणेश सावंत, विजय मोरे, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two two-wheeler thieves arrested in bhosari